Pune News : गुरुश्री एस जे यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात “मेडिटेशन अ टूल” या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : “मेडिटेशन” हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील असतात पण
इच्छा असूनही प्रेरणा न मिळाल्यामुळे अनेक जण दररोज “मेडिटेशन”करू शकत नाहीत. गुरुश्री एसजे यांनी विद्यार्थ्यांना नेमक्या याच मुद्द्यावर मार्गदर्शन करून, (Pune News) “मेडिटेशन” म्हणजे काय, रोज मेडिटेशन करण्यासाठी स्वतः प्रेरणा कशी मिळवायची , मेडिटेशन चे काय आणि कसे उपयोग होतात, जीवनाच्या सर्वच आघाड्यांवर उत्तम वाटचाल करण्यासाठी मेडिटेशन चा कसा टूलम्हणून उपयोग होतो अश्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन गुरुश्रीनी विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल जागरूकता निर्माण केली.

विद्यार्थ्यांना समजतील आणि कायम लक्षात राहतील अशी उदाहरणे देऊन गुरुश्रीनी विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगितला. गुरुश्रींच्या मार्गदर्शनाखाली सेशनमध्ये सर्वानी “मेडिटेशन” चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सेशन नंतर आपणही “मेडिटेशन” ला दैनंदिन जीवनाचा भाग बनवू शकतो आणि प्रगतीपथावर वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता.

Alandi News : पौष पौर्णिमेच्या निम्मिताने खंडोबा देवाचा लग्न सोहळा उत्साहात

अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन मिळाल्यामुळे आणि विशेषतः “अभ्यासामध्ये” या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित प्राध्यापकांनी गुरुश्रींचे आभार मानले. (Pune News) “विद्यार्थ्यांसाठी” अश्या विषयांवर सत्र आयोजित केल्यामुळे गुरूश्री एसजे यांनीही महाविद्यालयाचे आणि प्राचार्यांचे विशेष आभार मानले. गुरुश्री एसजे यांचे विद्यार्थ्यांसाठी होणारे पुढील सेशन हे 5 फेब्रुवारी 2023 रोजी “FOMO- Fear of Missing Out” या विषयावर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.