Pune : मी पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक – वसंत मोरे

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी(Pune) माझ्यावर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.मी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडत आहे.पण मी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.अशी भूमिका मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केली.

मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या (Pune)वाढदिवसनिमित्ताने कात्रज येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भेट देऊन वसंत मोरे यांना शुभेच्छा देखील दिल्या.

Pune : बिहाईंड द वुड्स” लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन.

त्यावेळी वसंत मोरे म्हणाले की,मागील पंधरा वर्षांपासून कात्रज भागातून नगरसेवक म्हणून काम पाहत आलो आहे.त्या काळात कात्रज परिसराचा सर्वागीण विकास करण्याची संधी मिळाली.त्याबद्दल मी नागरिकांचे विशेष आभार मानत असल्याची भावना यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की,माझ्यावर बारामती मतदार संघात संघटन वाढविण्याची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली असून ती जबाबदारी मी चोख पणे पार पडत आहे.माझ्यावर जरी बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली असली तरी मी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले की, 15 किंवा 16 ऑक्टोबर रोजी माझ्या कार्यालयाचे उदघाटन करण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.