Maharashtra: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे देखील वाटप होणार

एमपीसी न्यूज – पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा (Maharashtra) कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच इतर खात्यांचे मंत्री देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 सुधारणा(Maharashtra)अधिनियम 2012 मधील मार्गदर्शक सूचना 9.3 मध्ये संदर्भ क्र.2 अन्वये खंडकरी शेतकऱ्यास 1 एकर पेक्षा कमी क्षेत्र परत करावे लागत असल्यास, असे क्षेत्र परत करण्यात येऊ नये, अशी सुधारणा करण्यात आली होती. मात्र, माजी खंडकरी शेतकरी यांच्याकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन 1 एकरापेक्षा कमी क्षेत्र देय असल्यास देखील त्याचे वाटप करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

Sangvi : दुकानाला लागलेल्या आगीत संगणक, फर्निचर जाळून खाक

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये निश्चित केलेले किमान प्रमाणभूत क्षेत्राचे उल्लंघन न करता शेतकऱ्यास देय क्षेत्र वाटप करण्यात यावे, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.