Pune : यजमान एसएनबीपीचा प्रभावी मोठा विजय

एमपीसी न्यूज : यजमान एसएनबीपी अकादमी संघाने  (Pune) 16 वर्षांखालील एसएनबीपी राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेला झकास सुरुवात करताना ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी संघावर 9-0 असा विजय मिळविला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेतील अन्य सामन्यात आर. के. रॉय अकादमी, ध्यानचंद अकादमी, फ्लिकर ब्रदर्स हॉकी अकादमी, रिजनल डेव्हलपमेंट सेंटर, मुंबई स्कूल स्पोर्ट्स संघटना संघांनी दणदणीत विजय मिळविले. दुसऱ्या दिवशी पाच सामन्यात 50 गोलची नोंद झाली.

ड गटात पहिला सामना खेळणाऱ्या एसएनबीपी संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मोठा विजय मिळविला. आकाश पटेल, शुभम राजभार, कुंदन रौथ आणि विष्णू कोळी यांनी प्रत्येकी दोन, तर कुमार पटेलने एक गोल केला.

अ गटात ध्यानचंद अकादमी संघाने कल्लू अलीच्या चार गोलच्या जोरावर रायन इन्स्टिट्यूट संघावर 18-0 अशी मात केली. अमित बाबाने दुसऱ्या मिनिटाला खाते उघडल्यावर सुरु झालेला त्यांचा गोलधडाका अखेरपर्यंत कायम होता. मिथलेश यादव, (Pune) जितीनने दोन, तर करणधार तुषा शर्माने तीन गोल केले. अब्दुल कादीर, रितेश पांडे यांनीही प्रत्येकी दोन गोलचे योगदान दिली. अभिषेक कुजुर आणि अवनीश पटेलने एक गोल केला.

एफ गटातील सामन्यात फ्लिकर्स ब्रदर्स अकादमीने केशव, देव गुप्ता आणि सौरवच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर ग्रासरुट हॉकी संघाचा 11-0 असा पराभव केला. कमलतप्रीत सिंग, नितीन, साहिल कुमार, मनिष, संजोत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Chinchwad : चार सराईत गुन्हेगारांना अटक; पाच पिस्टल, दहा काडतुसे जप्त

निकाल – Pune 

क गट – रिजनल डेव्हलपमेंट सेंटर 6 (मनहेम चम्पिया 16 वे मिनिट कॉर्नर, विवेक सॉय 29 वे मिनिट कॉर्नर, मुकुट लिंडा 51 वे, 52वे मिनिट, सुनिल भेंग्रा 53वे मिनिट, अनुज केरकट 56वे मिनिट) वि.वि. स्मार्ट हॉकी अकादमी 3 (हार्स सारस्वत 19वे मिनिट, रविकांत कुमार 44 वे मिनिट, बजरंगी सिंग 57 वे मिनिट) मध्यंतर 2-1

एच गट – आर. के. रॉय अकादमी पुढे चाल वि. सेल हॉकी अकादमी

अ गट – ध्यानचंद अकादमी 18 (अमित बा 2रे मिनिट, मिथलाश यादव 4, 12 वे मिनिट, जितिन 8, 10वे मिनिट, तुषार शर्मा 15, 21, 24वे मिनिट, अब्दुल कादिर 19, 34वे मिनिट, अभिषेक कुजुर 20वे मिनिट, कल्लु अली 22, 23, 26, 28 वे मिनिट, रितेश पांडे 39, 40वे मिनिट, अवनीश पटेल 48वे मिनिट) वि.वि. रायन इन्स्टिट्यूट 0 मध्यंतर 8-0

ड गट – एसएनबीपी अकागमी 9 (आकाश पटेल 3रे, 26वे मिनिट, शुभम राजभार 11, 18वे मिनिट, आशिष कुमार 19वे मिनिट, कुंदन रौथ 22, 42वे मिनिट, विष्णू कोळी 22, 42 वे मिनिट) वि.वि. ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी 0 मध्यंतर 5-0

एफ गट – फ्लिकर ब्रदर्स हॉकी अकादमनी 11 (केशव 15, 52वे मिनिट, देव गुप्ता 20. 36वे मिनिट, कमलतप्रीत सिंग 39वे मिनिट, नितिन 40वे मिनिट, साहिल कुमार 42वे मिनिट, सौरभ 44, 47वे मिनिट, मनिष 57 वने मिनिट, संजोत सिंग 59वे मिनिट) वि.वि. ग्रासरुट हॉकी 0 मध्यंतर 2-0

ब गट – मुंबई स्कूल स्पोर्ट्स संघटना 11 (विपिन पाल 5, 6वे मिनिट, 26वे मिनिट, रणधीर सिंग 7वे मिनिट, 23वे मिनिट, आरोहा मराठे 16वे मिनिट, शशांक कुमार 20, 24वे मिनिट, अवनिश यादव 21वे मिनिट, शुभम भारतीय 44वे मिनिट, 57वे मिनिट) वि.वि. टाटा स्टिल फौंडेशने 1 (पुना बडिंग 48वे मिनिट) मध्यंतर 6-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.