Pune : भाजप एज्युकेशन सेलच्या वतीने नीव पुरस्कार सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – विद्यार्थी घडवण्यामागची शिक्षकांची मेहेनत (Pune) आणि वचनबद्धतेची दखल घेत दरवर्षी पुणे आणि आसपासच्या शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा गौरव भाजप एज्युकेशन सेल, पुणे तर्फे नीव पुरस्कार देऊन करण्यात येतो. या वर्षी 80 शाळा तसेच 200 हुन अधिक शिक्षक आणि मुख्यध्यापकांच्या उपस्थितीत नीव पुरस्काराचे वितरण आमदार जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि शहर सरचिटणीस गणेश घोष यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने जागतिक चळवळीच्या अनुषंगाने, केशव सीता ट्रस्टच्या सहकार्याने ‘प्लास्टिक महामारी’ हा गो ग्रीन उपक्रम सुरू करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजिका सीमा तंवर यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, या उपक्रमाचा उद्देश प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवणे, पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि तरुण पिढीमध्ये पर्यावरण विषयी जबाबदारीची भावना निर्माण करणे हा असून शाळांच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करण्याच्या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे.

Pune : यजमान एसएनबीपीचा प्रभावी मोठा विजय

या वर्षीचा नीव जीवनगौरव पुरस्कार रुपाली ढमढेरे क्लस्टर प्रिन्सिपल ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी कुमार, संस्थापक (Pune) संचालक ऑर्किड स्कूल, गुंजन श्रीवास्तव संचालक ऑर्बिस स्कूल, प्राचार्य डॉ. रेखा पाठक, डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, रश्मी गुप्ता, प्राचार्य सी. पी.गोएंका इंटरनॅशनल स्कूल, मसरत तवावाला, संचालक सुंदरजी ग्लोबल अकादमी, पूर्णिमा शेट्ये, सहसंस्थापक एनार्क एज्युकेशन, मधुलिका शर्मा – मुख्याध्यापिका अमनोरा स्कूल यांना देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.