Maval : ‘पीसीयु’ च्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पीसीईटी शैक्षणिक संकुला मधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण (Maval)दिले जाते. देशातील नामांकित शिक्षण संस्था मध्ये पीसीईटीचा समावेश होता. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला 32 वर्षांची शैक्षणिक परंपरा आहे. आता पीसीईटीने साते, मावळ येथे पिंपरी चिंचवड विद्यापीठ सुरू केले आहे. संस्थेची आजपर्यंतची वाटचाल पाहता पीसीयुच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, अशा शब्दांत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात रविवारी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम (Maval)अधिस्वीकृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी पीसीईटीचे कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, प्रबंधक डॉ. डी. एन. सिंग, विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.

Talegaon : जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे साखळी उपोषण सुरू

हर्षवर्धन पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. कला, वाणिज्य ,विज्ञान या नियमित( Maval)अभ्यासक्रमांबरोबरच अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, औषध निर्माण, मानसशास्त्र असे विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले असून दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पीसीईटीच्या शैक्षणिक संस्थां मधून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, तंत्रनिकेतन, विविध विषयांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय अशा शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था आकुर्डी, रावेत, तळेगाव परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि राज्यातील उत्तम कॅम्पस प्लेसमेंट यासाठी सुप्रसिद्ध असलेली संस्था आहे. संशोधनासाठी अद्ययावत प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. संशोधन क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये एक मोठी झेप संस्थेने घेतली असून सुमारे अडीचशे कॉपीराइट्स आणि साडेचारशे पेटंट्स संस्थेने मिळवले आहे. यासाठी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये या कार्याची दखल घेण्यात आली आहे. पीसीईटीमध्ये डिजिटल क्लासरूम’ वाय-फाय, कॅम्पस लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा. त्यासोबत विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र होस्टेल्स, मेस, दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था या सोयी उपलब्ध आहेत. ‘एआयसीटीई’, ‘डीटीई’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी उच्चस्तरीय यंत्रणांच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक प्रगती करतानाच ‘एनआयआरएफ’ रँकिंग मध्ये सलग चार वर्षे भारतातील पहिल्या दोनशे क्रमांकात स्थान, नॅक, एनबीए, आयएसओ अशा नामांकनाच्या वरच्या दर्जाने संस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे. आकुर्डी, रावेत, तळेगाव येथील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. येथे केजी ते पीजी पर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात.

अल्पावधीतच पीसीईटीने देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. दर्जेदार शिक्षण, उत्तम प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता या त्रिसूत्री मुळे संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 23 विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये यूएसए, रशिया, युके, मलेशिया, थायलंड, इटली, आयर्लंड, जपान, डेन्मार्क, नेदरलँड, व्हिएतनाम इत्यादी देशांमधील विद्यापीठांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी यावेळी दिली.

 

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.