Nigdi : निगडी येथे दोन दिवसीय महोत्सवाने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – देव देव्हाऱ्यात नाही, विठ्ठला तू वेडा कुंभार, बाई मी विकत घेतला श्याम, कानडा राजा पंढरीचा अशी (Nigdi) भाव आणि भक्तीपर रचना… कुरवाळु का सखे, हृदयी प्रीत जागते, नवीन आज चंद्रमा, सांग तू माझा होशील का? अशा प्रेमगीतांनी… का रे दुरावा, एक धागा सुखाचा यांसारख्या विरहगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध गायक श्रीधर फडके व गायिका निश्चल यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. शनिवार व रविवारची संध्याकाळ गदिमांच्या आठवणीने उजळून निघाली.

प्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रपट कथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गदिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात हा महोत्सव पार पडला.

यावेळी निर्माते-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी या निमित्ताने सुधीर फडके यांच्याबद्दलच्या अनेक अपरिचित गोष्टी चरित्रपटातून पाहायला मिळतील, असे नमूद करत प्रेक्षकांशी संवाद साधला. श्रीधर फडके यांनीही बाबुजींबद्दल आठवणी सांगितल्या.

महोत्सवात पहिल्या दिवशी गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर, पार्श्वगायक हृषीकेश रानडे, पार्श्वगायक प्रसन्नजीत कोसंबी, गायिका मनिषा निश्चल यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

Maval : ‘पीसीयु’ च्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल – चंद्रकांत पाटील

मिलिंद कुलकर्णी यांच्या निवेदनाने सादरीकरणाला साज चढला. मिहिर भडकमकर, अमृता ठाकूरदेसाई, प्रसन्न बाम, डॉ. राजेंद्र दुरकर, (Nigdi)अपुर्व द्रविड, ऋतुराज कोरे या वाद्यवृंदाने साथसंगत केली.

दुसऱ्या दिवशी श्रीधर फडके व मनीषा निश्चल यांनी गीत गायन केले. सुकन्या जोशी यांनी निवेदन, तर झंकार कानडे, तुषार आंग्रे, अमेय ठाकुरदेसाई, प्रणव हरिदास, सिद्धार्थ कदम या वाद्यवृंदाने बहारदार साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.