Chikhali : पूर्व वैमानस्यातून एकाचे अपहरण आणि खून

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीचे (Chikhali) कुदळवाडी येथून अपहरण केले. अपहृत व्यक्तीचा चऱ्होली येथे नेऊन खून केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) सायंकाळी घडली.

 

सिराज अहमद अबुल हसन खान (वय 40, रा. कुदळवाडी, चिखली) असे अपहरण आणि खून (Chikhali) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निजाम अहमद अब्दुल हसन खान (वय 42, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सफीउद्दिन मोहम्मद शरीफ खान (वय 40, रा. कुदळवाडी, चिखली), अनिस (रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : ‘पीसीयु’ च्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल – चंद्रकांत पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सिराज खान याचे आरोपींसोबत मागील दीड महिन्यांपूर्वी भांडण झाले होते त्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी आरोपींनी सिराज खान यांचे कुदळवाडी मधून अपहरण केले सिराज खान यांना चऱ्होली येथील अरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला निर्जन स्थळी नेले.

तिथे सिराज यांच्या डोक्यात आणि तोंडावर हातोडीचे घाव घालून त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.