Pune : सकाळनगरमध्ये सख्ख्या बहिणीच्याच घरात पतीसह बहिणीने केली चोरी

एमपीसी न्यूज : सख्खी बहिण पतीसह नाशिक येथे गेली (Pune) असताना तिच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सख्ख्या बहिणीच्याच घरात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सख्ख्या बहिणीसह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेरच्या सकाळ नगर येथील पुष्पहास बंगला येथे हा प्रकार घडला. चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 53 वर्षीय महिला आणि तिचा पती सलीम उर्फ सालेम शेख (वय 53) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  60 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर सलीम उर्फ सलीम शेख हा फिर्यादीचा दाजी आहे.

हे सर्व सकाळ नगरमध्ये एकत्र राहतात. 27 जून ते 29 जून या (Pune) काळात फिर्यादी या घराला कुलूप लावून नाशिक येथे त्यांच्या पतीसह गेल्या होत्या.

यावेळी दोन्ही आरोपींनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटात ठेवलेले 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले..

चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Kothrud : टीचर शाळेत केस ओढतात, हात कापू का विचारतात? तीन वर्षीय चिमुरडीच्या तक्रारीनंतर वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.