Pune : सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाकडून वैद्यकीय स्नातक तुकडीचा सैन्य दलात समावेश

एमपीसी न्यूज – पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Pune) कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड ग्राउंडवर 57 व्या तुकडीतल्या 121 वैद्यकीय स्नातकांना सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत रुजू करून घेण्यात आले. (हा गौरवपूर्ण समारंभ शनिवारी (दि. 29) झाला. लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, एव्हीएसएम, व्हीएसएम, पीएचएस,सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक, वरिष्ठ कर्नल कमांडट,सैन्यदल वैद्यकीय कॉर्प्स प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी, वैद्यकीय छात्र प्रभात तिवारी यांच्या नेतृत्वाखालील कमिशनिंग परेडची पाहणी केली.

एमयुएचएसच्या 2022 च्या हिवाळी सत्रात एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत महाविद्यालयाचे 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये परदेशातल्या चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, एसएम, व्हीएसएम,एएफएमसीचे संचालक आणि कमांडट यांनी दिली.

98 पुरुष आणि 23 महिला छात्रांचा सशस्त्र दल सेवेत समावेश करण्यात आला. 96 जणांचा लष्करात,11 जणांचा नौदलात आणि 14 जणांचा हवाई दलात समावेश करण्यात आला.

सेवेत रुजू करण्याच्या समारंभानंतर शैक्षणिक पारितोषिक प्रदान कार्यक्रमही झाला. वैद्यकीय छात्र साग्निक तालुकदार, संस्थेच्या प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रपती सुवर्ण पदक’ आणि ‘कलिंगा चषक’ या दोन पारितोषिकांचा मानकरी ठरला. देशातल्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत एएफएमसीने सातत्याने आपले स्थान राखले असून सीईओवर्ल्ड मॅगेझीनच्या 2022 च्या सर्वेक्षणानुसार जगातल्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शाळांमध्ये 37 वे स्थान प्राप्त केले आहे.

नैसर्गिक आपत्ती,महामारी,जागतिक संकट आणि युद्धकाळात आपल्या सेवेद्वारे या संस्थेच्या स्नातकानी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

 

Pune Breaking News : पुणे पोलिसांनी जप्त केले 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज; ए.आर. रहमान शोच्या अनुषंगाने मोठी कारवाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.