Pune Breaking News : पुणे पोलिसांनी जप्त केले 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज; ए.आर. रहमान शोच्या अनुषंगाने मोठी कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Breaking News ) मोठी कारवाई करून सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. यासोबतच हे ड्रग्ज ए.आर. रहमान यांच्या शोमध्ये घेऊन जाणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

आज पुण्यात संगीतकार ए. आर. रहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्ट देखील पडत आहे. या धर्तीवर पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मध्य प्रदेशातून आलेल्या तीन आरोपीना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी गेल्या एक महिन्यापासून पुण्यात वास्तव्यास होता.

लाईव्ह कॉन्सर्ट सारख्या ठिकाणी तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच याआधी देखील (Pune Breaking News ) अशा मोठया कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्ज सापडले आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.

Alandi : आळंदी स्मशानभूमी परिसर दुरावस्थेत

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.