Alandi : आळंदी स्मशानभूमी परिसर दुरावस्थेत

एमपीसी न्यूज : आळंदी येथील स्मशानभूमी  (Alandi) परिसर अनेक दिवसांपासून दुरावस्थेत दिसून येत आहे. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारा जवळील स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने त्याचा दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत असतो. तसेच, गॅस दाहिनी शेड जवळील परिसरात (कंपाउंडच्या भिंतीलगत) मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येत आहे. गॅस दाहिनी शेड जवळील परिसरात विकृत नागरिक शौच करत तेथील परिसर अस्वच्छ करतानाचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. 

स्मशानभूमी मधील एक लोखंडी शव दाहिनी दुरावस्थेत असून तेथील शवदाहिनी विकसित करावी. शव दाहिनीच्या संख्येत आणखी दोनने वाढ करावी. यासाठी मनसेने 27 एप्रिल रोजी पालिकेला निवेदन दिले आहे.

शवदाहिनी जवळील परिसर ही मोठा दुरावस्थेत दिसून येत आहे. दगड मातीचा राडरोडा तेथील परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. तेथील परिसर पालिकेमार्फत विकसित व्हावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

तसेच, डिसेंबर 2021 मध्ये गॅस दाहिनी पालिकेला उपलब्ध झाली आहे. गॅस दाहिनीसाठी शेडची व्यवस्था  (Alandi) करण्यात आली आहे. परंतु, त्या शेडमध्ये ती गॅस दाहिनी व तिचे साहित्य विना वापरता पडून आहेत. जवळ जवळ सव्वा वर्ष पालिकेने गॅस दाहिनी कार्यरत करून तिची सुविधा का उपलब्ध करून दिली नाही? याबाबत नागरिकांमध्ये नेहमीच चर्चा असते.

Maharashtra News : जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी – महसूलमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.