Pune : धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय पुणे आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (Pune)यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर धनकवडी येथे महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध (Pune)नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एक हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. हा मेळावा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Pune : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.