Chinchwad : शहरात रस्ता सुरक्षा अभियानास सुरुवात; मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांची रॅली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (Chinchwad) वतीने राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांची रॅली काढण्यात आली. सोमवारी (दि. 15) भक्ती शक्ती चौक ते मोशी येथील ट्राफिक पार्क या मार्गावर ही रॅली काढण्यात आली.

राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर सर्व संबंधित संस्था संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार जनजागृती आणि प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त सोमवारी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांची जनजागृती रॅली काढण्यात आली.

Pune : धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

सोमवारी सकाळी नऊ वाजता भक्ती शक्ती चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पुढे आकुर्डी चौक, एस के एफ मार्गे रामकृष्ण नाट्यगृह, चिंचवड स्टेशन, केएसबी चौक, स्पाईन रोड मार्गे मोशी येथील ट्राफिक पार्क येथे आली. ट्राफिक पार्क (Chinchwad) येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) अतुल आदे, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, परिवहन विभागातील अधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक उपस्थित होते.

पुढील महिनाभर राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर, शाळा-महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन, जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.