Pune :यशस्वी उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन, दूरदर्शीपणा गरजेचा- प्रतापराव पवार

एमपीसी न्यूज : “कोणताही उद्योग यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन, झोकून देऊन काम(Pune)करण्याची वृत्ती, दूरदर्शीपणा, कामाची शिस्त आणि जोखीम पत्करण्याची तयारी हवी. उद्योग-व्यवसायासाठी भांडवल नव्हे, तर नाविन्यपूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची गरज असते. त्यातूनच यशस्वी उद्योगाची पायाभरणी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी केले.

मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘ग्रेट भेट’ संवाद कार्यक्रमात प्रतापराव पवार यांचा (Pune)औद्योगिक जीवनप्रवास उलगडला. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट्समध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, उपाध्यक्ष नितीन भोसले, सचिव राजेश कुऱ्हाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते असोसिएशनच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे (डिरेक्टरी) प्रकाशन करण्यात आले.

Pune – पुण्यातील पहिल्या ‘पिकलबॉल’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

प्रतापराव पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. (Pune)त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करावीत. महाराजांचे जीवन उद्योग, सामाजिक कार्याला दिशा देणारे आहे. आपल्या व्यवसायाची सखोल माहिती व लोकांची गरज याची सांगड घालता आली पाहिजे.

आज अनेक पर्याय, तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून आपण उद्योग सुरु करावेत. अपयशातून शिकत जावे. जिद्द सोडू नये. उद्योजकासह चांगला व्यक्ती बनण्यावर लक्ष द्या. नाउमेद होता काम नये. इतरांशी तुलना किंवा गुणदोष शोधत बसण्यापेक्षा योग्य मार्गाने व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करावे.”

“मराठा उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून एकमेकांच्या साहाय्याने प्रगती साधण्याचा (Pune) हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपल्या भवतालच्या यशस्वी उद्योजकांचा प्रवास आपण जाणून घेतला पाहिजे. आज यशस्वी उद्योग म्हणून नावारूपाला आलेल्या संस्थांचा इतिहास अत्यंत खडतर आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, आलेल्या आव्हानांचा सामना करत ही मंडळी यशस्वी उद्योजक बनलेली आहेत. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी,” असेही प्रतापराव म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आईच्या कडक शिस्तीमुळेच माझा आजवरचा औद्योगिक प्रवास चांगला झाला आहे,” जिद्द, आत्मविश्वास, त्याला मिळालेली कठोर परिश्रम आणि बाजारपेठेची जाण यामुळे यशस्वी उद्योजक होता येते, असेही त्यांनी नमूद केले.

अरुण निम्हण यांनी स्वागत-प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. असोसिएशनद्वारे मराठा समाजातील उद्योजकांना मार्गदर्शन, व्यवसायाच्या संधी, औद्योगिक कंपन्यांना व उद्योजकांना भेण्याची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विद्युलता गावडे यांनी केले. आभार राजेश कुऱ्हाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.