Pune News : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई; 2000 बॉक्स जप्त

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर (Pune News) प्रशासन अलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी नुकतेच 4000 हुन गुन्हेगारांची कोम्बिंग ऑपरेशनद्वारे तपासणी केल्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 2000 बॉक्स जप्त करण्यात आले

पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या 7 आरोपीमधील काही जणांवर याआधी देखील अवैध रित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही ट्रकमधूनही दारू गोव्यातून निघून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात असताना ही कारवाई करण्यात आली.

Pune News

Pune Police : नववर्षाच्या आधी पुणे पोलिसांनी केली 4000 हून अधिक गुन्हेगारांची तपासणी

विशेष म्हणजे यातील आरोपींनी पोलिसांना (Pune News) संशय येऊ नये यासाठी या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या. मद्यसाठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली, तर वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये या हेतूने हा शक्कल लढवली होती. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.