Pune News: पुणे जिल्ह्यातील तरुणांना ‘अग्नीवीर’च्या माध्यमातून लष्करात जाण्याची संधी, अशी करा नोंदणी

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुणे, नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यातील उमेदवार या मेळाव्यात भाग घेऊ शकणार आहेत. (Pune News) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत हा मेळावा पार पडणार आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क, स्टोअर किपर आणि अग्निवीर ट्रेडर्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे.

 

 

 

या भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना https://join indian army.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. 30 जुलै पर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. भरती संदर्भातली सविस्तर माहिती https://join indian army.nic.in याच वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज कशा प्रकारे भरायचा, परीक्षा कशा असतील, प्रक्रिया काय असेल याची सर्व माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. अशी माहिती भरती कार्यालय मुख्यालय रिक्रुटी पुणेचे संचालक मेजर येशू राजू के यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.