Ravet Water Supply: रावेत येथील पंपिंग यंत्रणेत बिघाड, पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज: रावेत येथे पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने या परिसरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा अनियमित, विस्कळित व कमी दाबाने झाला आहे. (Ravet Water Supply) तसेच यमुनानगर, साईनाथनगर या भागाचा पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्या भरण्यासाठी उशीर होणार असल्याने या भागात सकाळी 9.30 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे.

दि 13 रोजी रावेत येथे पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने सकाळी 8.45 ते दुपारी 4 या वेळेत फेज 3 सेक्टर 23 येथून S2  कृष्णानगर साठी पंपिंग पूर्ण बंद होते. त्यामुळे बुधवारी चिखली,रामदासनगर, महादेवनगर,पाटीलनगर,बगवस्ती, शेलारवस्ती, सोनवणेवस्ती रस्ता, जोतिबानगर, रुपीनगर,पूर्णानगर,म.फुलेनगर, कृष्णानगर,शिवतेजनगर, सचिन परिसर,कोयनानगर,शरदनगर, सुदर्शननगर,नेवाळेवस्ती,तुळजाईनगर,अजंठानगर, मोहननगर या सर्व भागाचा पाणीपुरवठा अनियमित,विस्कळित व कमी दाबाने झाला होता.

 

 

त्यामुळे गुरूवार दि 14 रोजी यमुनानगर, साईनाथनगर या भागाचा पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्या भरण्यासाठी उशीर होणार असल्याने सकाळी 9.30 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती (टॉवर लाईनवरील भाग) या भागाचे पाणी दुपारी 12 च्या दरम्यान सोडण्यात येईल. (Ravet Water Supply) याची संबंधित नागरिकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.