Pune News : पोटनिवडणुकीचे एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

एमपीसी न्यूज- भारत निवडणूक आयोगाने 215 – कसबा पेठ व  205 – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा (Pune News) तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला आहे.

Talegaon Dabhade : मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ

त्यामुळे 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी  दिली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध (Pune News) असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.