Talegaon Dabhade : मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव शिंदे यांचा सहृदय सेवापूर्ती शुभेच्छा (Talegaon Dabhade) समारंभ संपन्न झाला. त्यांना निरोप देत असताना अनेकांनी त्यांच्या सेवाकाळातील आठवणी सांगत वातावरण भारावून टाकले.

पुढील काळात देखील त्यांनी संस्थेसाठी कार्यरत राहावे, अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रकाश शिंदे यांनी सत्काराबद्दल बोलतान सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव शिंदे यांचा सहृदय  सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला.

Talegaon Dabhade : बदलत्या जगाबरोबर जाण्याचा प्रयत्न करीत आहे इंद्रायणी विद्या मंदिर- रामदास काकडे     

कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके,सचिव यादवेंद्र खळदे,सहसचिव प्रा.वसंत पवार, खजिनदार नंदकुमार शेलार, सदस्य डॉ.दत्तात्रय बाळसराफ,माजी सहा. संचालक शिक्षण विभाग अशोक राजगुरू,सहाय्यक आयुक्त भरत गाडे, आळंदीच्या माजी नगराध्यक्षा मंदाकिनी वाघमारे,मारुती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भारत ठाकूर,माजी उपसरपंच जालिंदर धामणकर,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब छबुराव कारके,गुलाब धामणकर,मकरंद ढम,रोहिदास तुकाराम धामणकर,जयसिंग ठाकूर,मुरलीधर ठाकूर,कैलास ठाकूर,रोटरीयन आनंद नवाथे उपस्थित होते.

तसेच उर्से येथील ग्रामस्थ,मित्रपरिवार,माजी विद्यार्थी, शिंदे कुटुंबीय व त्यांचे आप्तेष्ट, संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

सरस्वती व विठुरायाच्या पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला,याप्रसंगी अभंग गायनाने वातावरण मंगलमय झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी केले, त्याप्रसंगी संस्थेच्या वाटचालीत  प्रकाश शिंदे यांचे अमूल्य योगदान, उर्से येथील श्री पद्मावती विद्या मंदिराच्या स्थापनेतील शिंदे सरांचे  कार्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, सरांच्या सेवाकाळातील विविध प्रसंग याचे विवेचन करण्यात आले,उपस्थित मान्यवरांपैकी (Talegaon Dabhade) शिक्षक प्रतिनिधी कल्पना गाडे,अर्चना आपटीकर,संतोष भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.

PMRDA : नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- एकनाथ शिंदे

शिंदे सरांच्या सहवासातील विविध आठवणी व विविध प्रसंग,त्यामुळे कामाला मिळालेली ऊर्जा, त्यांच्यातील विविधांगी गुणविशेषता व्यक्त करून सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अशोक राजगुरू,मकरंद ढम,रोहिदास तु.धामणकर,भारत ठाकूर,भरत गाडे,रोटरीयन आनंद नवाथे यांनी  मनोगतातून सरांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला,त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष सुनील शेळके, सचिव  यादवेंद्र खळदे ,खजिनदार नंदकुमार शेलार, सदस्य डॉक्टर दत्तात्रय बाळसराफ यांनी शिंदे सरांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .पुढील काळातही संस्थेच्या कामकाजात सरांचा सहभाग असेल ,असे मत व्यक्त करून सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या वतीने श्री.शिंदे सरांना मानपत्र,सन्मानचिन्ह,भेटवस्तू देऊन  यथोचित सन्मान करण्यात आला.

केलेल्या सन्मानाचा स्वीकार करून मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सेवकाळात कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल  ऋण व्यक्त केले.संस्थेने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करून  सेवा अर्पण केली, त्यातून मलाही समाधान मिळाले अशी भावना सरांनी (Talegaon Dabhade) व्यक्त केली. मानपत्राचे  वाचन प्रतीक्षा ढवळे यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे कलाशिक्षक श्रीहरी तनपुरे यांनी श्री प्रकाश शिंदे सरांचे छायाचित्र रांगोळीतून रेखाटले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन पाटील यांनी केले . नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री.संतोष खामकर यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने  कार्यक्रम संपन्न झाला.शिक्षकांनी गायलेल्या  भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

https://youtu.be/qan2uLjp1gU

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.