Pune News : व्हॅलेनटाईन डे दिवशीचे अपप्रकार टाळण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, महाविद्यालये येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी 50 हून अधिक ( Pune News ) निवेदने सादर करण्यात आले आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’  दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे संस्कृती रक्षण चळवळ राबवण्यात येत आहे.

Pune News : पोटनिवडणुकीचे एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. सिंहगड रस्ता येथील नगरसेविका ज्योती गोसावी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग (प्राथमिक) तसेच (माध्यमिक)पुणे महापालिका यांच्या कार्यालयात निवेदने देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन आणि महाविद्यालये येथे एकूण 50 हून अधिक ठिकाणी निवेदन देण्यात आली. ही मोहीम 14 फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे.

निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या
1) 14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची गस्ती पथके नियुक्त करून शाळा-महाविद्यालय परिसरात अपप्रकार करणारे समाजकंटक, अति वेगात वाहन चालवणारे युवक यांवर कारवाई करावी.

2) शाळा-महाविद्यालयांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात अशा प्रकारच्या मागण्या पोलिसांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

3) शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना कुप्रथांचे दुष्परिणाम सांगून भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगणारे व्याख्यान आयोजित करावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयांच्या ( Pune News ) मुख्याध्यापकांकडे करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.