Pune News : नवले पूलाजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ ( Pune News) भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजकुमार सप्रे (वय 32 , रा. लेबर कॅम्प, मिटकॉन स्कूलमागे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

 

राजकुमार बालेवाडीतील मिटकॉन स्कूलमागे असलेल्या बांधकाम प्रकल्पावर कामाला होता. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ असलेल्या नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सप्रेला धडक दिली.

 

 

Pune News : नरपतगिरी चौकातील श्री साईबाबा मंदिरातून दानपेटी चोरीला

 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सप्रेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल ( Pune News) करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.