Pune News : नरपतगिरी चौकातील श्री साईबाबा मंदिरातून दानपेटी चोरीला

एमपीसी न्यूज – सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी (Pune News) दानपेटी चोरल्याची घटना उघडकीस आली. 31 मार्च रोजी रात्री हा प्रकार घडला.

 

 

Hadapsar : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

 

याबाबत दिलीप बहिरट (वय 55 , रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे मंदिर आहे.

 

 

श्री रामनवमीनिमित्त मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंदिराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याबाबतची माहिती मिळाली नाही.

 

 

पोलिसांकडून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत (Pune News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.