Hadapsar : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -भरधाव वाहनाने पादचारी (Hadapsar )ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील मुंढवा-मांजरी रस्त्यावर घडली. अंगद किसन गायकवाड (वय 61 , रा. माळवाडी, मांजरी बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

 

Today’s Horoscope 02 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

 

गायकवाड सकाळी मुंढवा-मांजरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक (Hadapsar )नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.