Pune News : सुवर्णतुला’, ‘सौभद्र’मधील नाट्यपदे ऐकण्याची रविवारी संधी

एमपीसी न्यूज – संगीत सुवर्णतुला आणि संगीत सौभद्र या व इतर नाटकांमधील लोकप्रिय नाट्यपदे ऐकण्याची संधी पुणेकरांना (Pune News) मिळणार आहे. स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे स्वरराज छोटा गंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार 8 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी, अप्पा बळवंत चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा चारुशीला केळकर आणि उपाध्यक्षा सुचेता अवचट यांनी निवेदनाद्वारे दिली.

पुण्यातील युवा आणि प्रथितयश कलावंत ही नाट्यपदे सादर करणार आहेत. जुनी संगीत नाटके  कलाकारांच्या साथीने पुन्हा मंचस्थ करून रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणे आणि मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानपुणे कार्यरत आहे.

Pimpri News : 18 व्या जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण

स्वरराज छोटा गंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाट्यपद गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांनी गायलेली आणि रसिकमान्य ठरलेली नाट्यपदे चिन्मय जोगळेकरतेजस मेस्त्रीवेदवती परांजपेप्रज्ञेश नेर्लेकरअभिषेक अवचटवैजयंती जोशीस्नेहल पोतदारसौरभ खानविलकरसन्मिता धापटे हे कलावंत नाट्यपदे सादर करणार असून संजय गोगटे (ऑर्गन)विद्यानंद देशपांडे (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमास रसिकांना (Pune News) प्रवेश खुला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.