Pune Accident : शाळेतून घरी जाताना दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि चार वर्षाच्या नातवाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुरंदर तालुक्यातील (Pune Accident) पुणे-पंढरपूर रस्त्यावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात 63 वर्षीय व्यक्ती आणि त्याचा नातू जागीच मरण पावला. तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. गोकुळ धोंडिबा झेंडे (वय 63 वर्ष) आणि पद्मनाभ झेंडे (वय 4 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

Pune Railway : आरपीएफ जवानाच्या सतर्कतेने वाचले महिलेचे प्राण; ट्रेनमध्ये चढताना गेला होता तोल!

गोकुळ झेंडे हे त्यांच्या (Pune Accident) नातवाला सायंकाळी शाळेतून घरी घेऊन जात होते. रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या एका दुचाकीने आजोबांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले, नातवाचा जागीच मृत्यू झाला तर आजोबांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.