Pune : नवले पुलावर पुन्हा अपघात; चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली

एमपीसी न्यूज : नवले पुलावरील (Pune) अपघात थांबत नसून अवजड वाहनांचे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. आज सकाळी पुन्हा एकदा एका ट्रक चालकाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  

ही घटना काही वेळापूर्वी घडली आहे. नवले पुलाजवळ एक अवजड 10 टायर कर्नाटक पासिंग ट्रकची वॅगेनर कार आणि इतर चार लहान वाहनांना धडक झाली. सुदैवाने कारमधील एका सहप्रवाशाला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.

Pune : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना आता घरातून करता येणार मतदान

ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला, मात्र ट्रक ताब्यात घेण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.