Pune : पुण्याचे किमान तापमान 11 अशांवर, तीन दिवसात उष्णतेची जागा घेतली थंडीने

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे शुक्रवारी (दि.23) किमान (Pune) तापमान 11.7 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. दोन ते तीन दिवसांपुर्वी पुणेकरांनी 30 अंशा पर्यंत गरमी सहन केली. त्याच उष्णतेची जागा आता थंडीने घतली आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर टोपी पुन्हा बाहेर निघाले आहेत.

उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवस हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला.

Pune : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना आता घरातून करता येणार मतदान

 

शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान सातत्याने कमी होत (Pune) आहे. पुढील दोन दिवसही किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज खात्यातर्फे वर्तविण्यात आला. मकर संक्रांतीनंतर कमाल तापमानाचा पारा वाढतो. मात्र, यंदा संक्रांतीनंतर थंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहान हवामान खात्याने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.