Pune : पुरंदर सायकल क्लब तर्फे पुणे ते धनुषकोडी 1500 किमी सायकल आठ दिवसात प्रवास यशस्वीपणे पूर्ण

एमपीसी न्यूज – प्रभु श्रीरामचंद्र यांच्या (Pune) अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पुरंदर सायकलिस्ट क्लबने 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही 1500 किमीची दक्षिण भारत सायकल मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत एकूण तेरा सायकलिस्ट सहभागी झाले होते.

धनुषकोडी-दक्षिण भारत मोहिमेत सासवड, हडपसर, कात्रज, वडगाव शेरी आणि पुणे शहर परिसरातून संतोष झेंडे, शंतनू निगडे,.मनोज मेमाणे, सुहास गदादे, ललित वाल्हेकर, संकेत नंदवंशी , सुजित बाठे, राहुल घुले, पी.एस.आय पृथ्वीराज आबा शिंदे, अनिल सणस, प्रसन्न कुलकर्णी, अशोक पाटील,.शिवराज चिमलगीकर असे एकूण तेरा सायकलस्वार सहभागी झाले होते.

या मोहिमेचे सुरुवात इंडो ॲथलेटिक्स सोसायटी ज्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून शिवतीर्थ-पुरंदर येथून मोहिमेला सुरुवात झाली. पुणे ते सोलापुर अल्मट्टी डॅम, हंपी, राजा रामदेव यांची कृष्णगिरी भूमी, करूर, मीनाक्षी मंदिर-मदुराई, रामेश्वरम ते भारत भूमीचे शेवटचे टोक असलेले रामसेतू म्हणजेच धनुषकोडी असा आठ दिवसांचा हा सायकल प्रवास होता.

Maharashtra : विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत; राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

पुरंदर सायकलिस्ट क्लबच्या सायकलस्वारांनी मागील (Pune) चार वर्षात पुणे-पंढरपूर-पुणे, अष्टविनायक, पुणे-कन्याकुमारी, पुणे-पानिपत ते अट्टारी बॉर्डर, पुणे-गुजरात अशा लांब पल्ल्याच्या मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. पुरंदर ते धनुषकोडी सायकल मोहिमेसाठी इंडो एथलेटिक सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील, तसेच पुरंदर सायकलिस्ट क्लबचे अजित झेंडे,.केतन जगताप, विनायक चाळेकर, महेश बडदे, सतिश कुरपड, युवराज काळे, आकाश बडदे, गौरव बडदे, सेलम सायकल क्लब, जयकन्नू सुंदररज्जू सर, डिकथलाँन- बेंगलोर सिटी, बिष्णु शर्मा, नासा सायकल्स हडपसरचे नरेंद्र गुप्ता, मोरया सायकल्स-सासवडचे प्रविण बोरावके यांचे विशेष सहकार्य मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.