Pune : पुण्यातील पोटफोडे यांनी बनवलेल्या 120 किलो वजनाच्या तपेल्याला मिळणार समृद्धी महामार्गावरील शिल्पाचा मान

एमपीसी न्यूज – समृद्धी महामार्गावर सुशोभिकरणासाठी (Pune) विविध ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बसवल्या जाणार आहेत. तुर्तास तिथे लावलेली रंगीबेरंगी धातूची फुले चर्चेत होती. तिथेच आता कोपरगाव जवळ 120 किलो वजनाचा व पाच फुट उंचीचे तपेले शिल्प म्हणून बसवले जाणार आहे. या शिल्पाला साकारण्याचे आव्हान पुण्यातील तांबट आळीतील पिता-पुत्रांनी पेलले आहे.

तांबट आळीतील सुभाष उर्फ बंडू महादेव पोटफोडे व त्यांचा मुलगा सुरेंद्र पोटफोडे यांनी बनवलेल्या या तपेल्याचे पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या तपेल्या बद्दल सांगायचे झाले तर हे तपेले 5 फूट उंच, 4 फूट याचा वरचा व्यास, 6 फूट तळाचा व्यास असून वजन तब्बल 120 किलो आहे. तपेले साकारण्यासाठी पोटफोडे या पिता पुत्रांना 45 दिवसांचा कालावधी लागला.

Maharashtra : विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत; राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

पोटफोडे यांचा भांडी बनविण्याचा व्य़वसाय आहे. याच व्यवसायाचा आता (Pune) राज्य सरकारकडून एक प्रकारे सन्मान होणार असल्याचे समाधान असल्याचे मत पोटफोडे यांनी व्यक्त केले आहे. अगदी 17 व्या शतकापासून ज्या तांबट आळीचा उल्लेख आहे ती तांबट आळी आजही त्यांच्या नाविण्य व कलाकुसरीमुळे तग धरून आपली ओळख जपून आहे. सरकारने त्यांच्या या कामाची दखल घेतल्यामुळे तेथील नागरिकांनी देखील सरकारचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.