Maharashtra : उल्हासनगरमध्ये भाजप नेत्याने शिंदे गटातील नेत्यावर झाडल्या गोळ्या; जमिनीचा वाद की राजकीय नेमके कारण काय?

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये जमिनीच्या (Maharashtra) वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या.

हे दोघेही एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. जिथे प्रथम त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गणपत गायकवाड याने इन्स्पेक्टरसमोर महेशवर 6 राऊंड गोळीबार केला.

दोन गोळ्या महेशला तर दोन गोळ्या त्याचा साथीदार राहुल पाटीलला लागल्या. पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी रात्री भाजप आमदाराला ताब्यात घेतले होते. शनिवारी (3 जानेवारी) सकाळी आमदारासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेतील मालमत्तेबाबत वाद –

कल्याण पूर्वेकडील द्वारली संकुलात असलेल्या मालमत्तेच्या मालकी हक्कावरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरू होता. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्याशी परिसरातील लोक संपर्कात आहेत. 31 जानेवारीलाही जमिनीच्या वादावरून आमदार गणपत आणि महेश गायकवाड यांच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली होती. या वादामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Maharashtra) यांचा मुलगा वैभव आणि समर्थक तक्रार करण्यासाठी उल्हासनगरचे हिल लाइन पोलिस ठाणे गाठले होते.

Pune : पुरंदर सायकल क्लब तर्फे पुणे ते धनुषकोडी 1500 किमी सायकल आठ दिवसात प्रवास यशस्वीपणे पूर्ण

दुसरीकडे महेशही त्याच्या लोकांसह पोलिस स्टेशनला गेले.  इन्स्पेक्टर केबिनमध्ये दोन पक्षांमध्ये वादही झाला आणि भाजप आमदाराने महेशवर गोळीबार केला.

गणपत गायकवाड यांची मांडलेली बाजू – 

सदर वाद जमीन विषयक दिसत असला तरीगणपत गायकवाड याने मी गोळी झाडली मला त्याचा पश्चाताप नसल्याचे कबूल केले आहे. पोलिसांसमोर माझ्या मुलाला मारत होते. परंतु, पोलिस काहीही करत नसल्याने मी आत्मसंरक्षणासाठी गोळी झाडली. शिंदे गटाचे महेश गायकवाड वारंवार त्रास देत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. माझ्या कामाच्या जागी श्रीकांत शिंदे यांचे बॅनर लागतात. मी केलेल्या कामावर एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले जाते. मी भाजपच्या वरिष्ठ लोकांना तक्रार करूनही माझी तक्रार ऐकून घेतली नसल्याचे त्यांनी म्हंटले असून एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारखे गुन्हेगार निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.