Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर; पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा

एमपीसी न्यूज : भाजपचे ज्येष्ठ (Bharat Ratna ) नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अडवाणी हे भाजपमधील सर्वात जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्याच पुढाकाराने रामजन्मभूमीतील राम मंदिराचे आंदोलन तीव्र झाले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ‘मला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Maharashtra : उल्हासनगरमध्ये भाजप नेत्याने शिंदे गटातील नेत्यावर झाडल्या गोळ्या; जमिनीचा वाद की राजकीय नेमके कारण काय?

सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक अशी अडवाणी यांची ओळख आहे. भारताच्या (Bharat Ratna ) विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे जीवन सुरू होते. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत असे मोदी यांनी म्हंटले

पंतप्रधान पुढे म्हणाले,  राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्यांनी अनोखे प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हे मी नेहमीच माझे भाग्य समजेन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.