Pune Railway : आरपीएफ जवानाच्या सतर्कतेने वाचले महिलेचे प्राण; ट्रेनमध्ये चढताना गेला होता तोल!

एमपीसी न्यूज : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway) मोठा अपघात टळला. सकाळी सातच्या सुमारास एक महिला आपल्या मुलीसह ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होती. तिला काही मिनिटे उशीर झाला आणि ट्रेन पुढे जाऊ लागली.

प्रगती एक्स्प्रेस हळूहळू मुंबईच्या दिशेने जात असताना महिलेने ट्रेन पकडली आणि आपल्या मुलींना ट्रेनमध्ये बसवले. मात्र, महिला स्वत: ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला. महिला ट्रेनला लटकत असताना तिचा पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला होता. हा प्रकार सुरू असतानाच एक आरपीएफ जवान विनोद मीणा याने धडपडणाऱ्या महिलेला पाहिले. त्याने महिलेला पकडून रेल्वेखालून बाहेर काढले आणि (Pune Railway) तिचा जीव वाचवला.

Pimpri News : 18 व्या जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण

आरपीएफ जवान विनोद मीणा यांच्या सतर्कतेने महिलेचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.