Railway : पुणे ते दानापूर, पुणे ते गोरखपूरसाठी उन्हाळ्या सुट्टीनिमित्त अतिरिक्त रेल्वेच्या फेऱ्या

एमपीसी न्यूज – पुणे येथून दानापूर आणि गोरखपूरसाठी अतिरिक्त उन्हाळी रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांचे बुकिंग सोमवार (दि. 15 एप्रिल) पासून सुरु झाले आहे. पुणे ते दानापूर (Railway) चार फेऱ्या तर पुणे ते गोरखपूर दोन फेऱ्या (Railway) असणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत या गाड्या सोडल्या जाणार आहेत.

पुणे-दानापूर-पुणे 

पुणे- दानापूर अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी (गाडी क्रमांक 01147) पुण्याहून 16 एप्रिल रोजी सायंकाळी 7.55 वाजता सुटेल आणि  तिसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता दानापूरला पोहोचेल.

दानापूर – पुणे अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी (गाडी क्रमांक 01148) दानापूर येथून 18 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.35 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबेल. गाडीला 20 स्लीपर (अनारक्षित) आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

Summer Special Train From Pune :  पुण्याहून सुटणार उन्हाळी विशेष रेल्वे; जाणून घ्या विशेष गाड्यांचे वेळापत्रक

पुणे-गोरखपूर-पुणे

पुणे- गोरखपूर विशेष गाडी (गाडी क्रमांक 01151) पुण्याहून 16 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.50 वाजता गोरखपूरला पोहोचेल.

गोरखपूर – पुणे विशेष गाडी (गाडी क्रमांक 01152) गोरखपूरहून 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुण्याला सकाळी 6.40 वाजता पोहोचेल.

ही (Railway) गाडी हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती येथे थांबेल. गाडीला 1 फर्स्ट कम एसी 2 टियर, 8 एसी -3 टियर, 6 स्लीपर, 7 सामान्य द्वितीय श्रेणी सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर असे एकूण 22 आयसीएफ कोच असतील. गाडी क्रमांक 01151 साठी सोमवार (दि. 15) पासून बुकिंग सुरु झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.