Pune Railway : जानेवारी महिन्यात 19 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या (Pune Railway) प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यात 19 हजार 859 फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे विभागात जानेवारी मध्ये तिकीट तपासणीदरम्यान 19 हजार 859 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1 कोटी 26 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 7 हजार 766 प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी 45 लाख 75 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 176 प्रवाशांकडून 21 हजार 60 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Dehuroad : उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर अहमदनगरच्या कारखान्याचे बनावट लेबल

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य (Pune Railway) तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. विनातिकीट प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.