Pune News :भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यासाठी पीएमपीएमएलकडून वातानुकूलित ई-बसेसची सोय

एमपीसी न्यूज – गहुंजे स्टेडियम येथे 5 जानेवारी रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका 20-20 सामन्यासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएमएलकडून (Pune News) किफायतशीर तिकीट दरात पर्यावरणपूरक, वातानुकूलित दोन ई-बसेस उपलब्ध करून करून देण्यात आल्या आहेत.

या बसेसचा तपशील पुढीलप्रमाणे…

बस क्रमांक एक : बालेवाडी स्टेडियम ते गहुंजे स्टेडियम पार्किंग : सुटण्याची वेळ 3:30 वाजता: तिकीट दर 25 रुपये.
बस क्रमांक दोन : बालेवाडी स्टेडियम ते गहुंजे स्टेडियम पार्किंग : सुटण्याची वेळ 4:30 वाजता: तिकीट दर 25 रुपये

 

उपरोक्त नमूद केलेल्या बसेस गहुंजे येथील पार्किंग ठिकाणी पोहचल्यानंतर क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी व सामना संपल्यानंतर गहुंजे स्टेडियम पार्किंग ते गहुंजे स्टेडियम अशा फेऱ्या गर्दी संपेपर्यंत करतील. याबाबतची माहिती खालील प्रमाणे –

गहुंजे स्टेडियम पार्किंग ते गहुंजे स्टेडियम : तिकीट दर 10 रुपये

गहूंजे स्टेडियम ते गहुंजे स्टेडियम पार्किंग : तिकीट दर  10  रुपये

 

तसेच, गहुंजे स्टेडियम येथील गर्दी संपल्यानंतर सदर बसेस गहुंजे स्टेडियम पार्किंगकडून बालेवाडी स्टेडियमकडे येताना रूपये 25/- इतका तिकिट दर राहील. तरी, पीएमपीएमएलच्या पर्यावरणपूरक, वातानुकूलित ई-बसेसच्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमीनी घ्यावा, असे आवाहन पुणे परिवहन महामंडळाकडून (Pune News) करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.