Pune News : मोक्का कारवाई सुरूच ! दहशत पसरवणाऱ्या शेंडकर सह सात जणांवर मोक्का

एमपीसी न्यूज -पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत पसरवणाऱ्या (Pune News) गुंडांवर मोक्का कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. आता सराईत गुन्हेगार संदीप सोमनाथ शेंडकर आणि त्याच्या सहा साथीदारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

शेंडकर आणि त्याच्या गुंडांनी रंगपंचमी खेळणाऱ्या तीन तरुणांवर जुन्या भांडणाच्या रागातून वार करत गंभीर जखमी केले होते. पोलीस आयुक्तांनी ही केलेली 21 वी मोक्का कारवाई आहे.

PCMC : नागरिकांची राहण्यासाठी पिंपरी-चिंचवडला पसंती

टोळीप्रमुख संदीप सोमनाथ शेंडकर ऋषी शिवाजी भगत सुफियान बशीर शेख अल्ताफ सलीम शेख यांच्यासह इतर दोन आणि एका अल्पवयीन मुलावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी काही दिवसांपूर्वी तीन जणांवर लोखंडी हत्याराने प्राण घातक हल्ला केला होता.

यावेळी त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांनाही धमकी दिली होती. त्यानंतर हवेत शस्त्र फिरवत आरडा ओरडा करत त्यांनी सहकार नगर परिसरात दहशत पसरवली होती. सहकार नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान संदीप शेंडकर आणि त्याच्या साथीदारांवर सहकार नगर भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल होते. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात कुठलाही फरक पडला नाही. त्यांनी आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले होते.

त्यामुळे सहकार नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्मार्ट पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर(Pune News) या प्रस्तावाची पाहणी करून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.