Pune News : बारामती लोकसभा लढण्यास तृप्ती देसाई सज्ज…. म्हणाल्या, भाजपने जर….

एमपीसी न्यूज -सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडचे (Pune News) अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. एखादा पक्षाने आणि त्यातही  भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यास आपण शंभर टक्के ही निवडणूक लढू असे त्यांनी म्हटले आहे.

तृप्ती देसाई या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.2011 साली ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. तेव्हापासून त्या सातत्याने स्त्रियांच्या हक्कासाठी आंदोलन करत असतात.

Pune News : मोक्का कारवाई सुरूच ! दहशत पसरवणाऱ्या शेंडकर सह सात जणांवर मोक्का

शनिशिंगणापूर येथील चौथ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. इतकेच नाही तर जेव्हा जेव्हा महिलांवर अन्याय होतो तेव्हा तेव्हा त्या आवाज उठवत असतात.

याच तृप्ती देसाई यांनी आता बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने संधी दिली तर किंवा भारतीय जनता पार्टी (Pune News) सारख्या पक्षाने मला विचारणा केली तर मी निवडणूक लढवेन असं त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.