Pune News : 30 लाखाच्या खंडणीसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला धमकीचे फोन; पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या माजी (Pune News )नगरसेवकाला 30 लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. खंडणी न दिल्यास राजकीय करिअर नष्ट करण्याचा इशारा देखील एका फोनच्या माध्यमातून काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देण्यात आला आहे.

अविनाश बागवे यांनी या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फोन करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.

Pune News : बारामती लोकसभा लढण्यास तृप्ती देसाई सज्ज…. म्हणाल्या, भाजपने जर….

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारच्या सुमारास अविनाश बागवे यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप कॉल केला आणि इथून पुढे इलेक्शनला उभे राहू नकोस अन्यथा तुझी पॉलिटिकल करिअर बरबाद करिन अशी धमकी दिली.

तसेच या व्यक्तीने बागवे यांच्याकडे तीस लाख रुपये खंडणीची देखील मागणी केली. या व्यक्तीने, तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो असा आणखी एक मेसेज आला.

या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Pune News ) फिर्याद दिली. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.