Pune News : अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त विशेष ‘राष्ट्रभाव’ ऑनलाईन कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘राष्ट्रभाव’ या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या वतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी सकाळी 9 वाजता याचे सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या युट्यूब पेजवरून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 30 मिनिटांच्या या व्हीडीओमध्ये अनोख्या राष्ट्रभक्तीपर आणि वीररसपूर्ण गीतांचा समावेश असून सोबत व्हिडीओच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा आलेख यात मांडण्यात आला आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणीपासून आजपर्यंत भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख, भारताची सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा जगताची ओळख या कार्यक्रमातून आपल्याला पुन्हा एकदा होणार आहे.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमचा असा प्रयत्न आहे की, या ऑनलाईन कार्यक्रमात हजारो लोक एकाच वेळी सहभागी होतील आणि राष्ट्र भक्तीचा मोठा जागर निर्माण होईल. त्यासाठी आम्ही सर्वाना विनंती करतो की, आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांनी सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे युट्यूब सबस्क्राइब करून बेल आयकन प्रेस करून ठेवावे. यासाठी www.youtube.com/srajananimation या लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली असून त्यांना संतोष जाधव, अनुराग त्यागी, शशिकांत राउत आणि सचिन वाघमारे यांनी मार्गदर्शन केले आहे. या उपक्रमात चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

हर्षदा माळी, सेजल खर्चे, गौरी यादव, रुषा सुदित, अतुल कुमार, तुषार बारस्कर, ओमकार बोबडे, योगेश सावंत, पुष्पा भोसले, ओंकार नागापुरे, संजना बोधे, तेजस लडकत, ऋषिकेश गुंजाळ, आदित्य डहाळे, आदित्य हटकमकर, विराज खरात, मोहसीन शेख, प्रथमेश दाभाडे, अंकिता शर्मा, प्रदीप कोकाटे, निमिषा व्होरा, सर्वेश तागावले, ऋषिकेश हिरे, साक्षी कानडे, प्रणिती गायकवाड, केदार निमसे, कृष्णा मोरे, यश चौथाई, सागर नादिवडेकर, हेमंत जगताप, हर्षद काझी, प्रणिती गायकवाड, यश सोनावणे, मानस दोशी आदी विद्यार्थ्यांनी यासाठी ग्राफिक्स, ऑडीओ, व्हिडीओ एडिटिंगचे काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.