Pune News : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडेंचा कोचीमध्ये विशेष गौरव

एमपीसी न्यूज – इंडियन अॅनालिटिकल (Pune News) सायन्स काँग्रेसने (ISASC)आयोजित  केलेल्या कार्यक्रमात  पिंपरी चे पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. रमेश भोंडे यांना (ISASC)  सन्माननीय फेलोशिप देऊन गौरविण्यात येणार आहे.23 ते 25 मार्च या कालावधीत हा कार्यक्रम कोची मध्ये होणार आहे.

 

Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये गुढी पाडव्याला ‘ चैत्र पालवी ‘ कार्यक्रम

मधुमेह या विकारावर डॉ. रमेश भोंडे गेली पंचवीस वर्षे संशोधन करीत असून स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींचे पुनर्जीवन हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे. आईच्या दुधातील मूळ पेशींवर त्यांनी केलेल्या संशोधनाने त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. मूळ पेशींवरील त्यांच्या संशोधनाप्रित्यर्थ अत्यंत प्रतिष्ठेचे टीएमए पै अध्यासन दोनदा मिळविण्याचा दुर्मिळ सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. डॉ. रमेश भोंडे यांचे सुमारे 250 शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थ्यांनी Ph.D. प्राप्त केली आहे.
डॉ. रमेश भोंडे यांनी प्राणीशास्त्रातील पदवी फर्ग्युसन महाविद्यालयातून, M.Sc. पदवी पुणे विद्यापीठातून व Ph.D. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेतून (NIV) मधून प्राप्त केली. पुणे विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पहिले. बंगळूरस्थित स्टेमप्युटिक्स या संस्थेत तंत्रसंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मणिपाल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसीन येथे अधिष्ठाता म्हणून पाच वर्षे त्यांनी अध्यापनही केले. अनेक सन्मानांनी त्यांना (Pune News) यापूर्वी गौरविले गेले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.