Pune News : पुण्यात भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा धडकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोंढवा परिसरात भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला समोरून धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला आहे. 
राजेंद्र चंद्रकांत जाधव (वय ६८, रा. उंड्री) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशारापर्यंत सुरू होते.

कोंढवा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव हे त्यांच्या मोपेड दुचाकीवरून एमआयबीएम रस्त्याने जात होते. यावेळी येथील क्लोअर हायलँड इमारतीसमोर त्यांना समोरून आलेल्या पाण्याच्या टँकरने समोरून जोराची धडक दिली. यात राजेंद्र हे खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
 नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कोंढवा पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघात झाल्यानंतर टँकर चालक तेथून पसार झाला. दरम्यान, राजेंद्र यांच्या बाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.