Pune News : येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगारांमध्ये धुमश्चक्री, एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांमध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  सिगारेटच्या राखेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. कारागृहातील बरॅक क्रमांक सातमध्ये हा प्रकार घडला आहे.  दोघा सराईतांनी दुसऱ्या एका न्यायबंदीच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आहे. २८ एप्रिल रोजी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

याप्रकरणी राकेश उर्फ राक्या जॉनी सकट आणि सुरेश बळीराम दयाळू (दोघेही  न्यायबंदी येरवडा कारागृह) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल कालिदास लगस (वय २२, न्यायबंदी येरवडा कारागृह) यांनी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे सराईत गुन्हेगार आहेत.आरोपी राकेश आणि सुरेश न्यायबंदी आहे. तर अमोल लगस १८ जानेवारी २०२२ पासून न्यायबंदी आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कारागृह सर्कल तीनमधील बरॅक क्रमांक सातमध्ये आरोपी राकेश सिगारेट ओढत होता. त्या सिगारेटी राख अमोलच्या अंगावर गेल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग राकेशला आल्याने त्याने साथीदार सुरेश दयाळूच्या मदतीने झोपलेल्या अमोलच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी दोन्हीही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.