Pimpri Corona Update: शहरात आज 10 नवीन रुग्णांची नोंद, 2 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 465 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 70 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. सर्वच रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिका  रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन एकही नाही. 58 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. आज दिवसभरात 2 हजार 376 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 67 हजार 152 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.