Pune News : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू

  एमपीसी न्यूज –  पुणे – बंगळूर महामार्गावरील डुक्कर खिंडीमध्ये वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. प्रियंका अंकुश महाजन (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआकराच्या सुमारास घडला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन धोत्रे यांनी तक्रार दिली आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत प्रियांका या पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहण्यास होत्या. दोन दिवसांपुर्वी त्या दुचाकीवरून डुक्करखिंडी परिसरातून जात होत्या. यावेळी त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात खाली कोसळून प्रियंका या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा यात मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.