Pune News : पुण्यात राज ठाकरेंसाठी 200 पुरोहितांच्या उपस्थितीत महापूजा

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे पुण्यातील मुक्कामात औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी औरंगाबादला मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांच्या राहत्या घरासमोर १०० ते २०० गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राज ठाकरेंच्या बहुचर्चित औरंगाबाद दौर्‍याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. औरंगाबादमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी ते कार्यकर्त्यांसह औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहे. तत्पूर्वी उद्या सकाळी ८ वाजता पुण्यात महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पूजा होणार आहे. त्यांना पुढील कार्यासाठी यश मिळो असा शुभशीर्वाद गुरुजी देणार असल्याचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

 

त्यानंतर वढू येथे ते जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ जाऊन आशीर्वाद घेतील. त्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे मार्गस्थ होतील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.