Pune News : प्रभाग 13 मध्ये 200 घरगुती कामगारांचे लसीकरण; मंजुश्री खर्डेकर यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – काही दिवसात प्रभागातील सोसायटी व बंगल्यात राहणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी अत्यल्प झाल्याचे लक्षात आले व बहुतांश नागरिकांचा पहिला व दुसरा डोस झाला असल्याचे निदर्शनास आले. मात्र वस्ती विभागात अद्याप ही लसीकरणाबाबत पुरेशी जागृती झाली नसल्याचे ही लक्षात आले म्हणून त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

आज शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने विविध सोसायटीत काम करणाऱ्या घरगुती कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,भाजपचे प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, ऍड प्राची बगाटे, महिला आघाडीच्या आय टी प्रकोष्ठ पुणे शहर संयोजक कल्याणी खर्डेकर,गिरीजाशंकर सोसायटीचे अध्यक्ष संजय कबाडे, रवींद्र गोखले, कैलास ढंढ, सोपान वावरे, एस बी जोशी, स्वप्नील लडकत, प्रेरणा लडकत, के 52 सोसायटी चे शेखर वाईकर व मोठ्या संख्येने घरगुती कामगार उपस्थित होते. घरी काम करणाऱ्या महिलांना तसेच ड्रायव्हर, वॉचमन, गाडी धुणारे कामगार यांना कोव्हीशिल्डचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला.

गिरीजाशंकर सोसायटीच्या क्लब हाऊस येथे लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. कामावर जाण्याची लगबग, नोंदणीतील अडचणी व लसीची अनुपलब्धता अशा कारणांमुळे घरगुती कामगार लस घेण्यात टाळाटाळ / कंटाळा करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र ते काम करत असलेल्या ठिकाणी सहजगत्या लसीकरण होतं असल्याने गिरीजाशंकर विहार, पोतनीस परिसर, k52, नटराज सोसायटी, महिम्न सोसायटी या परिसरातील घरगुती कामगारांची सोय झाली व मोठ्या प्रमाणात लसीकरण करता आले असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. असेच उपक्रम अन्य मोठ्या सोसायटी व बंगलो भागात राबविण्यात येतील, असे कल्याणी खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.