Pune : हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; जेट जगदीश फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंदू देवतांविषयी आणि भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यातील ( Pune) विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश काबरे (रा. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सचित शामदत्त एरंडे (वय 37) यांनी तक्रार दिली आहे.

Pune : लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार दिल्याने तरुणीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी जगदीश काबरे यांनी फेसबुक वर जेट जगदीश, जगदीश काबरे, जेके या नावाने उघडलेल्या अकाउंट वरून हिंदू देवी देवतांविषयी, महापुरुषांविषयी तसेच साधुसंतांविषयी, आणि भारत मातेविषयी पोस्ट करून त्यांची बदनामी करून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या. अशी तक्रार फिर्यादी यांनी दिली होती.

विश्रामबाग पोलिसांनी आरोपी जगदीश काबरे यांच्या विरुद्ध कलम 295 (ए) 505 भादविसह कलम 67 (ए) आय टी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( Pune) दबडे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.