Pune : अटल बिहारी वाजपेयी मेडिकल महाविद्यालयातील तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर ( Pune ) पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल महाविद्यालयाचे डीन आशिष बंनगिवार यांनी दहा लाखांची लाच घेतल्याने मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर आशिष बंगिनवार यांच्या नावाच्या पाटीला प्रतिकात्मक पैशांचा हार घालण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाबाहेरील नावाच्या फलकावर प्रतिकात्मक नोटांचा हार घालण्यात आला. तर कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करीत निषेध नोंदवण्यात आला.

 

Pune : हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; जेट जगदीश फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर काल (दि .10 ) सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना या प्रकरणी  जामिन मंजूर करण्यात आला ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.