Pune : मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे पीएमपीएमएलच्या बाणेर रस्त्यावरील संचलनात बदल

एमपीसी न्यूज – मेट्रो प्रकल्पाचे शिवाजीनगर ते हिंजवडी माण फेज 3 या मार्गावरील काम सुरू( Pune) असल्यामुळे सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल बाणेर पर्यंत मेट्रोचे काम सुरु आहे.त्यामुळे 12 ते15 ऑगस्ट या कालावधीत बाणेर रस्त्यावरील पीएमपीएमएलच्या संचलनात बदल करण्यात आला आहे.

Pune : अटल बिहारी वाजपेयी मेडिकल महाविद्यालयातील तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

परिणामी बाणेर रस्त्यावरून संचलनात असलेले बस मार्ग क्र. 114,208, 256, 258 व 360 या बस मार्गांच्या वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करणेत आला आहे.या बस मार्गांवरील बसेस बाणेरकडे जाताना बाणेर फाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रोडने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉईंट हॉस्पिटल पासून डावीकडे वळण घेऊन लिंकरोडने सरळ पुढे ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यापासून पुढे पूर्ववत बस मार्गाने बसेसचे संचलन सुरू राहील.

तसेच दिनांक 16 ऑगस्ट  पासून सर्व बस मार्ग पूर्ववत संचलनात राहतील, याची सदर मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन पीएमपीएमएलतर्फे करण्यात ( Pune) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.